Video : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार, पाहा काय म्हणाले…
दोन निर्णय मी घेतले आहेत. पहिला राज्यसभेचा. येत्या जुलैमध्ये सहा जागा रिक्त होणार आहेत. यावर्षीची राज्यसभेची निवडणूक लवढणार, असल्याचे ते म्हणाले. तर ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. यापुढे मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, असेही ते म्हणाले. स्वराज्य संघटनेची स्थापना करून राज्यभर दौरे करणार असल्याचेही ते […]
दोन निर्णय मी घेतले आहेत. पहिला राज्यसभेचा. येत्या जुलैमध्ये सहा जागा रिक्त होणार आहेत. यावर्षीची राज्यसभेची निवडणूक लवढणार, असल्याचे ते म्हणाले. तर ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. यापुढे मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, असेही ते म्हणाले. स्वराज्य संघटनेची स्थापना करून राज्यभर दौरे करणार असल्याचेही ते म्हणाले. खासदारकीची टर्म संपल्यानंतर आता संभाजीराजे यांची राजकीय वाटचाल काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर छत्रपती संभाजीराजे यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केला. त्यासोबत या निवडणुकीला अपक्ष (Independent) सामोरे जाणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. अपक्ष म्हणून माझा कोणाला सन्मान करायचा असेल तर तो त्यांचा अधिकार असेल. मात्र सध्या तरी मी अपक्ष म्हणूनच लढणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेही आभार मानले.
Published on: May 12, 2022 02:28 PM
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
