माझ्या शुभेच्छा, सत्यमेव जयते; नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांचं उत्तर

फ्लेचर पटेल आणि यास्मिन वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंना सवाल केले आहेत. समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असे सवाल मलिक यांनी केले आहेत. त्याबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांना गाठलं आणि त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी 'माझ्या शुभेच्छा आणि सत्यमेव जयते' अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिलीय.

मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवलीय. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मलिक यांनी फ्लेचर पटेल आणि ‘लेडी डॉन’ या दोन व्यक्तींचा उल्लेख करत, वानखेडे यांना सवाल केले आहेत. मलिकांच्या या आरोपांबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांना विचारलं. त्यावेळी वानखेडे यांनी अवघ्या पाच शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे.

फ्लेचर पटेल आणि यास्मिन वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंना सवाल केले आहेत. समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असे सवाल मलिक यांनी केले आहेत. त्याबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांना गाठलं आणि त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ‘माझ्या शुभेच्छा आणि सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिलीय. त्यांनी याबाबत जास्त बोलणं टाळलं असल्याचं पाहायला मिळालं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI