Sangram Jagtap : औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्यांची.. ; संग्राम जगतापांचं वादग्रस्त विधान
MLA Sangram Jagtap News : माजी आमदार आसिफ शेख यांच्याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी वादग्रस्त विधान करत टीका केली आहे.
औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटलं आहे. माजी आमदार आसिफ शेख यांच्याबाबत संग्राम जगताप यांनी हे विधान केलं आहे. औरंगजेबाचं गुणगान करणाऱ्यांनी भारत सोडून पाकिस्तानात जावं असंही जगताप यांनी म्हंटलं आहे.
यावेळी बोलताना संग्राम जगताप म्हणाले की, औरंगजेबाची पैदाईश भारतीय नव्हती. त्याची वंशावळ परकीय होती. त्यामुळे जो भारतातला आणि महाराष्ट्रातला मुस्लिम धर्मीय आहे, त्याला औरंगजेबाची विचारसरणी मान्य होऊ शकत नाही. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे लोक कधीच भारतीय मुस्लिम होऊ शकत नाही. त्यामुळे याचाही डीएनए टेस्ट करावा लागणार आहे की हा कुठली व्यक्ति आहे, असं वादग्रस्त विधान जगताप यांनी केलं आहे. त्यांच्या या धार्मिक वादग्रस्त विधानामुळे अजित पवारांची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

