AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ही बकवासगिरी, तुम्ही का घाबरताय? राऊतांचा पॅनल सिस्टीमला विरोध, आयोगावर गंभीर आरोप अन् केली एकच मागणी

Sanjay Raut : ही बकवासगिरी, तुम्ही का घाबरताय? राऊतांचा पॅनल सिस्टीमला विरोध, आयोगावर गंभीर आरोप अन् केली एकच मागणी

| Updated on: Oct 15, 2025 | 1:04 PM
Share

संजय राऊत यांनी पॅनल सिस्टीमला बकवासपणा संबोधत तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपची बटीक झाल्याचा आरोप करत, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. राऊत यांनी मतदार यादीतील घोटाळे आणि राजकीय विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पॅनल सिस्टीमला बकवासपणा म्हणत या पद्धतीला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपची बटीक झाल्याचा आरोप केला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी राऊत यांनी केली. राऊत यांनी आरोप केला की, भाजपच्या हितासाठी निवडणूक आयोग काम करत आहे. त्यांनी पॅनल सिस्टीम ही भाजप सरकारने गोंधळ निर्माण करण्यासाठी आणली असून, ही एक प्रकारची फसवणूक असल्याचे म्हटले आहे.

एका शिंदे गटाच्या आमदाराने 20,000 मतदार बाहेरून आणल्याचा दावा केल्याचा संदर्भ देत, राऊत यांनी मतदार यादीतील कथित घोटाळ्यांवर प्रकाश टाकला. पैठणमध्ये 56,000 बोगस मतदार आढळल्याचा दावाही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या संजय राऊत कोण? या टिप्पणीवर राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, आगामी निवडणुकांमध्ये 51 टक्के मते मिळणार असल्याच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Published on: Oct 15, 2025 01:04 PM