AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut UNCUT | तुमची दाढी अजून जळतेय...मिस्टर मिंदे...; शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार पलटवार

Sanjay Raut UNCUT | तुमची दाढी अजून जळतेय…मिस्टर मिंदे…; शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार पलटवार

| Updated on: Jul 27, 2026 | 11:31 AM
Share

माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विजय जल्लोष मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जल्लोषावर टीका करत, "हा विजय उत्सव म्हणजे 'बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना' आहे," अशी प्रतिक्रिया दिली.

माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विजय जल्लोष मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जल्लोषावर टीका करत, “हा विजय उत्सव म्हणजे ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याला शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “ठीक आहे, आम्ही बेगाने शादीमधले दिवाने असू, पण तुम्ही कुठे आहात? तुमचा या आंदोलनाशी काय संबंध? जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुमच्या दाढीला आग लावली आहे. ती अजूनही जळत आहे. वरूनही धूर येतोय आणि खालूनही धूर येतोय. आता गप्प बसा, तुमची खूप बेअब्रू झाली आहे.”

पुढे बोलताना राऊत यांनी दावा केला की, शिवसेना (ठाकरे गट) पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभी होती. “मिस्टर मिंदे, तुम्ही या आंदोलनात कुठे होता? शिवाजी पार्कमध्ये विजय जल्लोष झाला आहे. आता पुढचा मुक्काम ठाण्यात असेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापलं असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.

 

Published on: Jul 27, 2026 11:31 AM

Follow Us