आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते धसांची माणूसकीची भेट, बीडच्या नेत्यांवर आरोप करणारे त्यांच्याच भेटीला कसे? राऊतांचा थेट सवाल
गाँग्स ऑफ वासेपूर वरून बीडच्या नेत्यांवर आरोप करणारे त्यांच्याच भेटीला कसे गेले? असा सवाल संजय राऊतांनी धसांना केलाय आणि त्यावरून भाजपवर साधलेल्या निशाण्यावर बावनकुळेंनी राऊतांच्या आरोपांना वेडेपणा ठरवलेलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या आरोपांवर आपण ठाम आहोत, असं सुरेश धस सांगत असले तरी त्यांच्या भेटीवरून आरोपांचा सिलसिला थांबत नाही. ज्या टोळीला गँग्स ऑफ मिर्झापूर म्हणालात त्यांच्याच भेटीला का गेलात? असा सवाल संजय राऊतांनी केलाय. बीडच्या नेत्यांवर आरोप करणारे त्यांच्याच भेटीला कसे गेले? असा सवाल राऊतांनी धसांना केलाय आणि त्यावरून भाजपवर साधलेल्या निशाण्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांच्या आरोपांना वेडेपणा ठरवलेलं आहे. दरम्यान सुप्रिया सुळेंनी भेट घेण्यात काही गैर नसल्याचे म्हणत या आधी घेतलेल्या भूमिकेचं काय असं म्हणत धस यांना प्रश्न केला आणि भाजपच्या विखे पाटील यांनी मात्र मुंडे यांच्या राजीनाम्यावर जो निर्णय अजित पवार घेतील तो आम्हाला मान्य असल्याच उत्तर दिलं आहे. दुसरीकडे नैतिकतेच्या आधारावर मुंडे राजीनामा का देत नाही? असा सवाल अजित पवारांना केला असता ते तुम्ही त्यांनाच विचारा, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मात्र अजित पवारांची प्रकृती बिघडली असून त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले. माहितीनुसार घशाच्या संसर्गामुळे अजित पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय.

'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार

'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल

मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
