Sanjay Raut : मराठीवर आक्रमण करणाऱ्यांच्या का बैठका घेताय? संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Press Conference : खासदार संजय राऊत यांनी आज प्रसार मध्यमांशी बोलताना मराठीच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पक्षात असलेल्या सगळ्या नेत्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत. मी अभिमानाने सांगतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या आहेत. साहित्यीकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत, आम्हाला शिकवू नका, बैठका घेताय हाच मराठीचा अपमान आहे, मराठीवर आक्रमण करणाऱ्यांच्या का बैठका घेताय? असा घणाघाती सवाल करत खासदार संजय राऊत यांनी मराठीच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणासाठी सक्ती करत आहेत? त्यांचा उद्देश काय? फडणवीसांनी मराठी भाषा अभिजात करावी. विचारा नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये हिंदी सक्ती का केली नाही? असे प्रश्न देखील यावेळी राऊतांनी उपस्थित केले आहेत.
यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, ज्या हिंदीसाठी फडणवीसांचा आटापीटा सुरू आहे, त्या उत्तरप्रदेश मध्ये 5 हजार हिंदी शाळा बंद पडल्यात. हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षक नाहीत. महाराष्ट्र मुंबईमध्ये हिंदी शिकवायची गरज नाही. फडणवीस मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मराठी शाळांच्या दुरावस्थेवर काम केलं पाहिजे. राज्य भाषेला कसं बळ मिळेलं, असंही राऊतांनी म्हंटलं.
Published on: Jun 24, 2025 11:35 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
