मोदी स्टेडियमवरुन ठाकरे-भाजपात टीकेचा सामना, …मग त्यात गैर काय? उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल
tv9 marathi Special Report | गुजरातच्या मोदी मैदानावरून ठाकरे - भाजपात टीकेचा सामना रंगताना दिसत आहे. विश्वचषक सामन्यासाठी पाकचा संघ गुजरातमधील अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर पाकच्या संघाचं ग्रँड स्वागत करण्यात आलं, उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | गुजरात येथील मोदी मैदानावरून ठाकरे – भाजपात टीकेचा सामना रंगलाय. पाकिस्तानी खेळाडूंच्या स्वागताचं उदाहरण देत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपकडून ठाकरे गटाच्या हिंदुत्वावर जी टीका होतेय, त्यावर ठाकरे यांनी निशाणा साधलाय. तर काही लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय जमत नाही, असं म्हणत प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलंय. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या कार्यक्रमात राज्यातील बेपत्ता होणाऱ्या मुली, कोयत्या गॅंगचे वार, सरकारी नोकरीचे कंत्राटीकरण यावरून शरद पवार यांनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं. पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंचं भव्य स्वागत केलं जातं हे फक्त गुजरातमध्येच होऊ शकतं मोदी आणि शाह यांच्या राज्यातच होऊ शकतं. हे इतर कोणत्या राज्यात झालं असतं तर भाजपने कपडे काढून विरोध दर्शविला असता आणि देशभक्तीसह हिंदुत्वाचे धडे दिले असते, असा राऊतांनीही हल्लाबोल केला होता.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

