छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय शिरसाट यांचं भाष्य, म्हणाले, ‘आता गुगली टाकलेल्या बॉलवर सिक्सर…’
VIDEO | 'शरद पवार लढण्याचा प्रयत्न करताय तर उद्धव ठाकरे रडण्याचा...', एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची सडकून टीका, जाहीर सभेतील भाषणावरून नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट
औरंगाबाद, २८ ऑगस्ट २०२३ | शरद पवार हे गुगली टाकतात पण प्रत्येक गुगलीला विकेट निघतेच असे नाही, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी औरंगाबादमध्ये केले होते. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी एखादा बॉलर गुगली बॉल टाकतो त्यावेळी बॅट्समन देखील त्याच ताकदीने तो बॉल मारतो. त्यामुळे प्रत्येक गुगलीला विकेट निघतेच असे होत नाही. तर गुगली टाकलेला बॉल देखील सिक्सर मारला जातो, हे येणाऱ्या राजकारणातून तुम्हाला दिसून आले आहे आणि अजित पवार यांनी त्याच गुगली बॉलवर सिक्सर मारला आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले तर एकीकडे शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही राज्यभर फिरताय आणि जाहीर सभा घेताय आणि राष्ट्रवादीकडून घेण्यात येणाऱ्या सभेला मोठी गर्दी दिसतेय. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी इतर राजकीय पक्ष संपवणार तर नाही? अशा प्रश्नावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या सभेत लाखो लोकं यायचं आता ती संख्या हजारावर आली. आता वेळ बदलली आता सहानुभूती नाही मिळू शकत त्यामुळे आता जनता रडणाऱ्यांसोबत नाही तर लढणाऱ्यांसोबत आहेत.’
Published on: Aug 28, 2023 05:30 PM
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
