Ashadi Wari 2025 : पैठणमध्ये संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरु
Paithan Eknath Maharaj Palkhi : संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात होणार असून, सायंकाळी पैठणहून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
पैठणमध्ये देखील आज संत एकनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू आहे. हजारो वारकरी नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. याठिकाणी देखील वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे.
संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात होणार असून, सायंकाळी पैठणहून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यावर्षी प्रथमच संत एकनाथ महाराजांच्या चांदीच्या पादुका 120 किलो चांदीच्या रथात ठेवण्यात येणार आहेत. दुपारी 12 वाजता जुन्या नाथ मंदिरातून चांदीच्या रथात पादुका ठेवून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. सूर्यास्ताच्या वेळी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या रथ निर्मितीसाठी नाथ वंशज रघुनाथ महाराज गोसावी यांच्या संकल्पनेतून भाविकांनी लोकवर्गणी जमा केली आहे. तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये खर्चुन हा रथ तयार करण्यात आला आहे. एकूण 18 दिवसांचा पालखी प्रवास असून विविध ठिकाणी नित्यधार्मिक कार्यक्रम, हरिपाठ व भजन आयोजित करण्यात आले आहेत.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

