Sant Tukaram Maharaj Palkhi : काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी..; तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala : संत तुकाराम महाराजांची पालखी काठेवाडीमध्ये दाखल झालेली असून मेंढ्याचं रिंगण याठिकाणी पार पडलं आहे.
संत तुकाराम महाराजांची पालखी काठेवाडीमध्ये दाखल झालेली आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात होणाऱ्या मेंढ्यांच्या रिंगण सोहळा देखील पार पडला आहे. येथील मेंढ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा पाहण्यासाठी आबालवृद्धांसह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. तुकोबांच्या पालखीला या मेंढ्या गोल रिंगण घालतात. अत्यंत नयनरम्य असा हा संपूर्ण सोहळा असतो. दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काटेवाडीत आगमन झाल्यावर पालखीला मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं. हा रिंगण सोहळा पाहायला दोन्ही पालखी मार्गावर वारकरी प्रचंड गर्दी करतात. मात्र काटेवाडीतलं मेंढ्यांचं रिंगण हे संत तुकाराम महाराज यांच्या वारीतलं किंवा पालखी सोहळ्यातलं अनोखं वैशिष्ट्य म्हणता येईल.
दरम्यान, याठिकाणी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि रिंगण स्थळावर मंडप उभारणी करण्यात आलेली आहे. परिसरातील विहिरींचे शुद्धीकरण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्यविषयक उपाययोजनाही केल्या आहेत.
Published on: Jun 27, 2025 04:58 PM
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
