Walmik Karad Call Recording Video : ‘ते आपलंच पोरगं..’, पोलीस अधिकाऱ्यासोबत वाल्मिक कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आपली प्रतिक्रया दिली आहे. मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही ९ मराठी करत नाही.
वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल झाला आहे. आरोपीला मदत करण्यावरून हा संवाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले आहेत. यातील आवाज माझा नाही, याप्रकारे मी गुन्हा दाखल करणार आहे, असे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी म्हटलंय. वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आपली प्रतिक्रया दिली आहे. ‘आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे. फरार असताना अशा ऑडिओ क्लिप टाकत आहे. याचं कारण म्हणजे फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बीडमध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या होत्या. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले यांचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल’, असं पोलिसांकडून सांगण्यात आले तर पुढे ते असेही म्हणाले की, ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत, असेही पोलिसांकडून सांगण्यात आलंय. मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही ९ मराठी करत नाही.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
