AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Dhuri In BJP : कट्टर मनसैनिक संतोष धुरी भाजपात, उद्धव ठाकरेंसमोर मनसे सरेंडर, ठाकरेंवर थेट हल्ला

Santosh Dhuri In BJP : कट्टर मनसैनिक संतोष धुरी भाजपात, उद्धव ठाकरेंसमोर मनसे सरेंडर, ठाकरेंवर थेट हल्ला

| Updated on: Jan 07, 2026 | 11:23 AM
Share

राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. धुरींनी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर पक्ष सरेंडर केल्याचा गंभीर आरोप केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील जागावाटप आणि अंतर्गत खदखद हे त्यांच्या पक्षांतराचे मुख्य कारण मानले जात आहे. या घटनेमुळे मनसेला मोठा धक्का बसला असून, मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

मुंबईच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संतोष धुरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये दाखल होताच धुरींनी ठाकरे बंधूंवर गंभीर आरोप केले. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर पक्षाला सरेंडर केल्याचा घणाघात त्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) झालेल्या संभाव्य युतीमुळे जागावाटपावरून मनसेमध्ये नाराजी पसरली होती. धुरींच्या मते, त्यांना हवी असलेली वॉर्ड क्रमांक १९४ ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आल्याने ते नाराज होते. या पक्षबदलामुळे मनसेमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली असून, भाजपला मुंबईत आणखी एक मजबूत चेहरा मिळाला आहे. धुरींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला.

Published on: Jan 07, 2026 11:22 AM