ललित पाटील प्रकरणात अद्याप सूत्रधाराचा थांगपत्ता लागेना, बघा स्पेशल रिपोर्ट
ललित पाटील प्रकरणावरून अद्याप राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरूच. काही दिवस उलटून गेलेत तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडलेला नाही. अशातच पुण्यातील ससून रूग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आलंय. मात्र ही कारवाई नसून केवळ नौटंकी असल्याचा विरोधकांचा आरोप
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | ललित पाटील प्रकरणावरून अद्याप राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. काही दिवस उलटून गेलेत तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडलेला नाही. अशातच पुण्यातील ससून रूग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आलंय. मात्र ही कारवाई नसून केवळ नौटंकी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर एक ड्रग्स तस्क ९ महिने सरकारी रूग्णालयात उपचार कसा घेतो. यावरून पोलीस आणि ससून रूग्णालय वादात आलंय. यावादादरम्यान, संजीव ठाकूर यांच्यावर याप्रकरणी ठपका ठेवण्यात आलाय. हा तपास सुरू असताना संजीव ठाकूर यांची डीन या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाऊ ड्रग्ज प्रकरणात नव्हे तर प्रशासकीय बदली प्रकरणात झालीये. मात्र सरकारचं हे फक्त ढोंग असल्याचा आरोप करत संजीव ठाकूर यांच्या अटकेची मागणी विरोधकांनी केलीये.
Latest Videos
Latest News