सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; कराड सोसायटी गटातून बाळासाहेब पाटलांची बाजी

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव केला.

सातारा:  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara District Bank Election) पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांच्या निकालांची उत्सुकता आहे. दरम्यान कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव केला. मात्र दुसरीकडे या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दोघांना  मात्र धक्कादायक पराभवाला समोर जावे लागले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI