Satara Rain | साताऱ्यासह पाटण तालुक्यात पाऊस, कोयना नदीवरील मोरगिरी पूल पाण्याखाली

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच साताऱ्यातील पश्चिम भागात मोठा पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे जवळपास 75 पेक्षा अधिक गावाचा संपर्क तुटला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Jul 24, 2021 | 10:09 AM

सातारा : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून अनेक भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड भागात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच साताऱ्यातील पश्चिम भागात मोठा पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे जवळपास 75 पेक्षा अधिक गावाचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वरच्या इतिहासात प्रथमच गेल्या 24 तासात 594 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.(Satara Heavy Rain in many area record rainfall Update)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें