AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Phaltan Doctor Death  : डॉक्टर तरुणीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? भावाने जे सांगितलं ते हादरवणारं... राजकीय नेते...

Phaltan Doctor Death : डॉक्टर तरुणीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? भावाने जे सांगितलं ते हादरवणारं… राजकीय नेते…

| Updated on: Oct 27, 2025 | 1:25 PM
Share

फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने पीएसआय गोपाल बडने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मृत डॉक्टरवर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी राजकीय तसेच पोलीस यंत्रणांकडून दबाव आणला जात होता, अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी तक्रार करूनही कारवाई झाली नव्हती.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तिने हातावर चार वेळा अत्याचार करण्यात आला असे लिहिले होते. या घटनेनंतर पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावर तिने आरोप केले आहेत, अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे.

मृत डॉक्टर गेली दोन वर्षे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती. मात्र, मागील एक वर्षापासून तिला सतत पोस्टमार्टम ड्युटी दिली जात होती. पोस्टमार्टम करत असताना तिला राजकीय नेते किंवा पोलिसांकडून रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी दबाव आणला जात असे. फिट रिपोर्ट अनफिट करा किंवा अनफिट रिपोर्ट फिट करा, तसेच रुग्णाला रुग्णालयात न आणताच रिपोर्ट तयार करण्यासाठी तिच्यावर दबाव होता, असे आरोप कुटुंबियांनी केले आहेत. हा दबाव तिने आपल्या बहिणीलाही सांगितला होता. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी मृत डॉक्टरने दोन महिन्यांपूर्वी जूनमध्ये डीवायएसपी आणि एसपी यांना लेखी पत्र दिले होते. त्याची पोचपावती कुटुंबियांकडे उपलब्ध आहे. मात्र, या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.

Published on: Oct 24, 2025 02:11 PM