AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video| अवैध बैलगाडी शर्यतीचं आयोजन भोवलं, सातारा पोलिसांकडून 30 जणांवर गुन्हा

| Updated on: Mar 17, 2021 | 11:03 AM
Share

खटाव तालुक्यात ललगुण येथे अवैध बैलगाडी शर्यती भरविल्या प्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. Satara Police Bailgadi Sharayat

सातारा: जिल्हयातील खटाव तालुक्यात ललगुण येथे अवैध बैलगाडी शर्यती भरविल्या प्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी बैल,छकडे,दुचाकीसह काही रोख रक्कम असा 5 लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. आठवडा भरात बैलगाडी शर्यतीवरील दुसरी कारवाई पोलिसांनी केली आहे.सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिस यांची संयुक्त कारवाई केली असुन पुसेगाव पोलिस याचा तपास करत आहेत. (Satara Police register case against organizers of Bailgadi Sharayat)

सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्यापासून राज्यातील बैलगाडी शर्यती बंद आहेत. शर्यतप्रेमींकडून ही बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी लपूनछपून बैलगाडा शर्यतीचं आयोजन केले जात असल्याचं पाहायला मिळतं.

(Satara Police register case against organizers of Bailgadi Sharayat)

Published on: Mar 17, 2021 11:01 AM