AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NIA च्या चौकशीत धक्कादायक माहिती; वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याचं मशीन; फेसशिल्ड आणि कॅप जाळली

या मर्सिडीज कारमध्ये जवळपास 5,75,000 लाखांची रोकड सापडली आहे. | Sachin Vaze NIA mercedes car

NIA च्या चौकशीत धक्कादायक माहिती; वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याचं मशीन; फेसशिल्ड आणि कॅप जाळली
या मर्सिडीज कारमध्ये जवळपास 5,75,000 लाखांची रोकड सापडली आहे. तसेच अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओची खरी नंबरप्लेट आणि आणखी काही बनावट नंबरप्लेटही या गाडीत सापडल्या आहेत.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Mar 17, 2021 | 9:44 AM
Share

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आता सचिन वाझे (Sachin Vaze) वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीत नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याची माहिती समोर आली आहे. एरवी बँकेत, दुकानात किंवा व्यापाऱ्यांकडून पैसे मोजण्यासाठी असे मशीन वापरले जाते. मात्र, सचिन वाझे आपल्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवत होते, याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Sachin Vaze investigation by NIA)

सूत्रांच्या माहितीनुसार, या मर्सिडीज कारमध्ये जवळपास 5,75,000 लाखांची रोकड सापडली आहे. तसेच अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओची खरी नंबरप्लेट आणि आणखी काही बनावट नंबरप्लेटही या गाडीत सापडल्या आहेत. याशिवाय, मर्सिडीजमध्ये केरोसीनची एक बाटली सापडली आहे. या केरोसीनच्या साहाय्याने सचिन वाझे यांनी डोक्यावरील कॅप आणि फेसशिल्ड जाळले होते. मात्र, ते पीपीई किट जाळायाला विसरले होते. दरम्यान, ज्याठिकाणी फेसशिल्ड आणि कॅप जाळण्यात आली त्याठिकाणी एनआयएची टीम तपासाला जाणार असल्याची माहिती आहे.

CIU च्या ड्रायव्हर पोलिसांची चौकशी होणार?

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून CIU विभागात चालक म्हणून काम करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवताना अनेक गाड्यांचा आणि नंबरप्लेटसचा वापर झाला होता. दोन गाड्या स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. तर सचिन वाझे स्वत: दोन मर्सिडीज कार वापरत असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यामुळे आता NIA CIU विभागात चालक म्हणून काम करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहे. यामुळे सचिन वाझे यांनी सरकारी आणि खासगी गाड्यांचा कशाप्रकारे वापर केला, हे समजू शकेल. सचिन वाझे यांनी जिलेटीन कुठून आणि कोणत्या गाडीतून आणले, याचा ‘एनआयए’कडून युद्धपातळीवर तपास सुरु असल्याचे समजते.

सचिन वाझेंनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट का रचला?

जा युनूस प्रकरणात निलंबित झाल्याने गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी आणि स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट रचल्याचा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केला आहे. गेल्या चार दिवसांपासून ‘एनआयए’कडून सचिन वाझे यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान सचिन वाझे यांनी ‘एनआयए’ला बरीच माहिती दिली आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, सचिन वाझे यांना पुन्हा प्रकाशझोतात यायचे होते. ख्वाजा युनूस प्रकरणामुळे पोलीस दलात गेलेली आपली पत पुन्हा मिळवायची होती. त्यामुळे सचिन वाझे यांनीच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी ठेवली. त्यानंतर याप्रकरणाचा यशस्वीपणे माग काढल्याचे श्रेय त्यांना मिळवायचे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, एनआयएला सचिन वाझे यांच्या या थिअरीवर विश्वास नसल्याचेही समजते.

संबंधित बातम्या:

मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार; परवानगीसाठी NIA ची गृहमंत्रालयाला विचारणा?

सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत, मोबाईल घरी ठेवून आले, कुटुंबीयही गायब

अंबानींच्या घराबाहेर आरामात सँडविच खाणाऱ्या वाझेंवर एटीएसचा अधिकारी भडकला

(Sachin Vaze investigation by NIA)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!