मोठी बातमी: पीपीई कीटमधील ती व्यक्ती सचिन वाझेच; CIU च्या कर्मचाऱ्याची कबुली?

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज तपासयंत्रणांच्या हाती लागले होते. यामध्ये या कटात सहभागी असलेली इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती. | SachinVaze ppe kit

मोठी बातमी: पीपीई कीटमधील ती व्यक्ती सचिन वाझेच; CIU च्या कर्मचाऱ्याची कबुली?
यामध्ये या कटात सहभागी असलेली इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती. एकदा या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता.
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 8:50 AM

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पीपीई किट घालून आलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याची माहिती आता समोर आली आहे. गुप्तवार्ता विभागाच्या (CIU) एका कर्मचाऱ्याने चौकशीदरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) दिल्याचे समजते. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सध्या सचिन वाझे यांच्या CIU युनिटमधील सहकाऱ्यांची कसून चौकशी सुरु आहे. सचिन वाझे यांचे निकटचे सहकारी रियाज काझी यांची सलग तीन दिवस चौकशी झाली आहे. रियाज काझी यांनीच या कटात वापरण्यात आलेल्या नंबरप्लेट बनवून आणल्याची माहिती आहे. (Ambani Bomb Scare NIA to probe if man spotted in PPE kit near Antilia was Sachin Vaze)

तर दुसरीकडे ‘द प्रिंट’ या इंग्रजी वृत्तपत्राने सचिन वाझे यांच्यासंदर्भात वृत्त दिले आहे. सचिन वाझे हे अंबानी यांच्या घराच्या परिसरात डोक्याला रुमाल बांधून वावरताना दिसल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज तपासयंत्रणांच्या हाती लागले होते. यामध्ये या कटात सहभागी असलेली इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती. एकदा या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे दिसून आले होते. ही व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएला दाट संशय आहे. त्यामुळे एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करुन चालायला लावणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता.

संबंधित बातम्या:

अंबानींच्या घराबाहेर कार सोडताना ओळख लपवण्यासाठी ‘त्या’ ड्रायव्हरकडून पीपीई किटचा वापर

सचिन वाझे यांचा पाठलाग होत असल्याचा दावा, वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं ‘त्या’ गाडीविषयी संभ्रम वाढला?

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही; सचिन वाझेंनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप

(Ambani Bomb Scare NIA to probe if man spotted in PPE kit near Antilia was Sachin Vaze)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.