सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत, मोबाईल घरी ठेवून आले, कुटुंबीयही गायब

सचिन वाझे यांचे कुटुंबीयही गायब आहेत. गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे यांच्या ठाण्यातील घरी कोणीच नाही. | Sachin Vaze NIA

सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत, मोबाईल घरी ठेवून आले, कुटुंबीयही गायब
सचिन वाझे

मुंबई: अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या तपासप्रकरणाच्या चौकशीत सचिन वाझे राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. NIA ने विशेष न्यायालयात ही माहिती दिल्याचे समजते. त्यानुसार सचिन वाझे यांनी NIAच्या कार्यालयात येताना स्वत:चा मोबाईल फोन आणलाच नाही. हा फोन घरी राहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, सचिन वाझे यांचे कुटुंबीयही गायब आहेत. गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे यांच्या ठाण्यातील घरी कोणीच नाही. त्यामुळे NIA च्या याप्रकरणाच्या मुळाशी जाण्यात अद्याप यश मिळालेले नाही. (Sachin Vaze iin investigation by NIA in Ambani bomb threat case)

याशिवाय, पोलीस तपासाच्या नावाखाली सचिन वाझे यांनी अनेक पुरावे नष्ट केल्याची माहिती आता समोर आली आहे. सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन प्रकरणात अनेक मुद्देमाल जप्त केला. मात्र, या गोष्टी त्यांनी पोलीस रेकॉर्डवर ठेवल्याच नाहीत, अशी माहिती आता पुढे आली आहे.

अंबानींच्या घराबाहेर आरामात सँडविच खाणाऱ्या वाझेंवर एटीएसचा अधिकारी भडकला

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके सापडल्यानंतर प्रोटोकॉलचे पालन न केल्याच्या कारणावरुन सचिन वाझे (Sachin Vaze) आणि राज्य दहशवातविरोधी पथकाच्या (ATS) एका अधिकाऱ्यामध्ये खटका उडाल्याची माहिती समोर आली आहे. या वादाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही देण्यात आली होती.

25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटके मिळाल्याचे समजल्यानंतर एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहोचले. तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्याने स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कुठे आहे, असा प्रश्न सचिन वाझे यांना विचारला. त्यावेळी सचिन वाझे सँडविच खात उभे होते. त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला, साहेबांना गाडी दाखव, असे फर्मान सोडले. सचिन वाझे यांच्या या वर्तणुकीमुळे संबंधित एटीएस अधिकारी प्रचंड संतापला होता. सचिन वाझे यांनी पोलिसांच्या प्रोटोकॉलचे पालन केले नाही, अशी तक्रारही त्याने वरिष्ठांना केल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

सचिन वाझेंच्या घराला टाळं; कुटुंबीयही 10-12 दिवसांपासून गायब, NIA घराची झडती घेणार?

मुंबई पोलिसातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी NIAची तयारी; दिल्लीतील तीन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

(Sachin Vaze iin investigation by NIA in Ambani bomb threat case)

Published On - 10:08 am, Tue, 16 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI