मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार; परवानगीसाठी NIA ची गृहमंत्रालयाला विचारणा?

लवकरच मुंबई पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. | NIA Mumbai Police

मुंबई पोलीस दलातील 'त्या' बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार; परवानगीसाठी NIA ची गृहमंत्रालयाला विचारणा?
या अधिकाऱ्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र, लवकरच मुंबई पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 11:14 AM

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याच्या कटात सहभाग असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) लवकरच मुंबई पोलीस दलातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. या अधिकाऱ्याच्या चौकशीची परवानगी मिळवण्यासाठी NIA ने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे विचारणा केली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर ‘एनआयए’चे प्रमुख या अधिकाऱ्याची चौकशी करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (NIA will now investigate ips officers in mumbai police force seeks permission form MHA)

या अधिकाऱ्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र, लवकरच मुंबई पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. NIA च्या चौकशीत API सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

बड्या अधिकाऱ्याची चौकशी करताना दडपण येऊ नये म्हणून तीन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल

‘एनआयए’ने दोन दिवसांपूर्वीच या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी तयारी करायला सुरुवात केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, NIA चे तीन वरिष्ठ अधिकारी सोमवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते. अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) दर्जाचे असल्याची माहिती मिळत आहे. सध्या एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण तपास सुरु आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. चौकशीदरम्यान सचिन वाझे यांनी मुंबई पोलीस दलातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता NIA या अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. हा अधिकारी अत्यंत मोठ्या पदावर असल्यामुळे विक्रम खलाटे यांच्यावर चौकशी करताना दडपण येऊ शकते. त्यामुळे NIA कडून आणखी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोण आहेत विक्रम खलाटे?

सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर अधिकारी विक्रम खलाटे रविवारी सकाळी मुंबईतील NIA च्या कार्यालयात पोहोचले. विक्रम खलाटे हे 2008-09 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. बारामती तालुक्यातील लाटे हे त्यांचं मूळ गाव आहे. गेल्या 13 वर्षांपासून ते पोलीस सेवेत कार्यरत असून त्यांना आतापर्यंत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दोनवेळा गौरवण्यात आले आहे. सध्या ते एनआयएचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

VIDEO: वाझेंचा पाय आणखी खोलात, त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती, बघा 24 फेब्रुवारीला इनोव्हा कुठून बाहेर पडतेय?

स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद

NIA will now investigate ips officers in mumbai police force seeks permission form MHA

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.