Tv9 Marathi Special Report | स्वत:च्या जीवावर जिंकतो, आमदाराचं एकनाथ शिंदेंना आव्हान!
सातारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वीच त्यांच्या गटातील आमदार महेश शिंदे यांनी सूचक इशारा दिला आहे. “मी स्वतःच्या जोरावर निवडून येतो,” असं स्पष्ट वक्तव्य करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या सभेला महेश शिंदे अनुपस्थित राहिले. कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळालं नसल्याने उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शिंदे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आलं होतं. मात्र, या कार्यक्रमाच्या पोस्टरवर महेश शिंदे यांचा फोटो नसल्याने नाराजी वाढल्याचं दिसून येत आहे. त्यांचा रोख पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महेश शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं दिसत आहे. 2019 पूर्वी भाजपमध्ये असलेले महेश शिंदे नंतर शिवसेनेत दाखल झाले होते. मात्र, सध्या ते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. कोरेगावच्या राजकारणातून महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होत असल्याचं चित्र दिसत आहे.
Published on: Apr 21, 2026 11:12 AM
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा