दूधाची 2 रुपयांनी दरवाढ करणार, ‘गोकुळ’ जिंकताच बंटी पाटलांची मोठी घोषणा

दूधाची 2 रुपयांनी दरवाढ करणार, 'गोकुळ' जिंकताच बंटी पाटलांची मोठी घोषणा

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:49 PM, 4 May 2021

मुंबई : गोकूळ दूध महासंघाची निवडणूक सतेज पाटील गटाने जिंकल्यानंतर सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी दूधाच्या दरात नक्कीच वाढ करणार. तसेच आगामी काळात दूध उत्पादन कसे वाढेल. तसेच शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय करता येईल यासाठी आगामी काळात प्रयत्न करु, असे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले.21 जागांपैकी 17 जागांवर सतेज पाटील गटाने बाजी मारली. तर बाकीच्या चार जागांवर महाडिक गटाने निवडणूक जिंकली.