Ajit Pawar | सतेज पाटील यांचं वय 50 तरी ते राज्यमंत्रीच, अजित पवार यांची टोलेबाजी

सतेज पाटील यांचं वय 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं आहे. किती दिवस काँग्रेस त्यांना राज्यमंत्री ठेवणार, अशी कोपरखळी अजित पवारांनी सतेज पाटलांना लगावली आहे. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीमध्ये डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेचं उद्घाटन पवारांच्या हस्ते करण्यात आलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वक्तृत्व शैलीसाठी, रोखठोक भाषणासाठी आणि कोपरखळ्यांसाठी ओळखले जातात. पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना अजित पवार यांनी काँग्रेस नेते आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना जोरदार टोला लगावलाय. सतेज पाटील यांचं वय 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं आहे. किती दिवस काँग्रेस त्यांना राज्यमंत्री ठेवणार, अशी कोपरखळी अजित पवारांनी सतेज पाटलांना लगावली आहे. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीमध्ये डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेचं उद्घाटन पवारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सतेज पाटलांना टोला लगावलाय.

पत्रकारांशी बोलाताना अजित पवार यांनी एक खळबळजनक दावा केलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छूक असल्याचा दावा अजितदादांनी केलाय. मात्र इलेक्टिव्ह मेरिटवर प्रवेश दिला जाईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जरंडेश्वर कारखाना कारवाई संदर्भात बोलताना त्याचा तपास ईडी करत आहे. त्यातून सत्य बाहेर येईल असं पवार म्हणाले. त्याचबरोबर छगन भुजबळांवरही आरोप झाला होता. त्यातून ते निर्दोष मुक्त झाले पण त्यांची दोन वर्षे तुरुंगात गेली त्याचे काय? असा सवालही पवारांनी विचारलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI