अपक्ष निवडून आले पण पुढची राजकीय दिशा काय? सत्यजित तांबे आज भूमिका मांडणार
अपक्ष निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजित तांबे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सत्यजित आज आपली भूमिका मांडणार आहेत. पाहा...
नाशिक पदवीधर निवडणुकीच्या प्रचंड चर्चा झाली. महाविकास आघाडी विरूद्ध सत्यजित तांबे, या लढतीत यांनी विजय खेचून आणला. महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांना हरवत सत्यजित यांनी निवडणूक जिंकली. अपक्ष निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजित तांबे काय भूमिका घेणार? ते काँग्रेसशी जुळवून घेणार की भाजपसोबत हात मिळवणी करणार? याची चर्चा होतेय. या सगळ्यावर सत्यजित आपली भूमिका मांडणार आहेत. सत्यजित तांबे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. नाशिकमध्ये संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सत्यजित तांबे आज पहिल्यांदा आपली जाहीर भूमिका मांडणार आहेत. निवडणूक काळात झालेल्या आरोपांवर सत्यजित काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

