AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sea Plane: राज्यात 'या' 8 ठिकाणी सी प्लेन सेवा होणार सुरू, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा?

Sea Plane: राज्यात ‘या’ 8 ठिकाणी सी प्लेन सेवा होणार सुरू, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा?

| Updated on: Jun 25, 2025 | 4:08 PM
Share

महाराष्ट्रातील आठ ठिकाणी 'एअरो ड्रोम' (जलाशयातील तात्पुरती धावपट्टी) उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला (MCA) सादर केला आहे.

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच आठ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि दुर्गम भागांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. याकरता केंद्र सरकारने ‘उडान 5.5’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत हेलिकॉप्टर आणि ‘सी-प्लेन’ सेवा सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. देशभरात दीडशे ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये राज्यातील आठ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

धोम धरण (वाई, सातारा)
गंगापूर धरण (नाशिक)
खिंडसी धरण (नागपूर)
कोराडी धरण (मेहकर, बुलढाणा)
पवना धरण (पवनानगर, पुणे)
पेंच धरण (पारशिवनी, नागपूर)
गणपतीपुळे (रत्नागिरी)
रत्नागिरी (रत्नागिरी)

Published on: Jun 25, 2025 04:08 PM