शुक्रवारी दिल्लीत लागलेल्या भयंकर आगीमध्ये 27 लोक जिवंत जळाले. काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे. सध्या आग आटोक्यात आली असली तर या आगीनं अनेकांची आयुष्य आणि संसार बेचिराख केले आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्टेशन जवळ एक व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यत आली. मात्र धुमसणाऱ्या आगीत 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग भडकल्यानंतर काहींनी तर तर इमारतीवरुन जीव धोक्यात घालत उड्या टाकल्या होत्या.