Telangana : तीन कोटींचं बक्षीस असलेला माओवादी चकमकीत ठार
Naxalite Encounter : तेलंगणा येथे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.
तेलंगणा येथे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारडपलीच्या घनदाट जंगलात ही चकमक सुरू होती. आज सकाळी माओवाद विरोधात झालेल्या चकमकीत तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीमध्ये माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि तब्बल तीन कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी गजर्ला रवी याला ठार करण्यात जवानांना यश आलं. त्याला ठार केल्यामुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. मारडपलीच्या दुर्गम वनक्षेत्रात भागात जवान आणि माओवाद्यांमुळे मोठी चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, तीन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दरम्यान, या चकमकीत ठार झालेली आणखी एक महत्त्वाची माओवादी ही महिला आहे. या महिलेचं नाव अरुणा आहे. तिच्यावरही 50 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलं होतं.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

