Devendra Fadnavis: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी का?; देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच मोठं विधान

राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनातही हीच भावना आहे

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Apr 24, 2022 | 7:44 PM

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे. खुद्द भाजपचे नेते अनिल बोंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनीही ही मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजप (bjp) नेत्यांची राष्ट्रपती राजवटीची मागणी जोर धरत असतानाच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी केली असेल. मात्र राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनातही हीच भावना आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें