Meera Borwankar : मीरा बोरवणकर यांच्या ‘त्या’ पुस्तकामुळे अजित पवार वादात? काय आहे नेमकं प्रकरण?
माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्याकडून नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या दाव्यामुळे अजित पवार यांच्यासमोर अडचण वाढणार का? मीरा बोरवणकर यांनी केलेले आरोप मात्र अजित पवार यांनी फेटाळून लावले आहेत.
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्तांनी पुण्याच्या माजी पालकमंत्र्यांवर आरोप आता वादात आलाय. २०१० मधील हे प्रकरण आहे. पुण्याचे पालकमंत्री होऊन अजित पवार यांना आठवडा सुद्धा होत नाही तोपर्यंत पुण्यातून नवा वाद समोर आलाय. २०१० मध्ये पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. तेव्हा पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर या होत्या. त्याच मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून अजित पवार यांच्यावर आरोप करण्यात आलेत. केलेल्या दाव्यानुसार, येरवडा पोलिसांची ३ एकर जागा एका बिल्डरला देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाहीतर या जमीन लिलावासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोपही त्यांनी या पुस्तकातून केलाय. ही लिलाव प्रक्रिया रखडली त्यामुळे या जमीनीचा लिलाव झाला नाही. मात्र प्रकरणावरून वर्तमानाील राजकारण चांगलंच तापलं आहे. बघा स्पेशल रिपोर्ट
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

