बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल; कारवाईची शक्यता
बंडातात्या यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिलाबाबतचं त्यांचं हे वक्कव्य खपवून घेतलं जाणार नाही. सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वच पक्षांच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. तसंच बंडातात्या यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली आहे. दरम्यान, बंडातात्या यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिलाबाबतचं त्यांचं हे वक्कव्य खपवून घेतलं जाणार नाही. सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

