सोनी हत्याकांड प्रकरण, मृत्यूदंड की जन्मठेप? कोणती होणार शिक्षा?
VIDEO | भंडाऱ्यातील सोनी हत्याकांडाप्रकरणी मृत्यूदंड की जन्मठेपेची होणार शिक्षा? याप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली महत्त्वाची माहिती
भंडारा : बहुचर्चित सोनी हत्याकांडातील सातही आरोपींना आज भंडाराच्या प्रमुख न्यायाधीशांनी वेगवेगळ्या कलमाखाली दोषी ठरवलेले आहे. विशेषतः 26 फेब्रुवारी 2014 च्या रात्री तुमसर येथील संजय सोनी त्यांची पत्नी पूनम सोनी आणि त्यांचा एकुलता एक मुलगा ध्रुमील यांचा गळा होऊन त्यांचा निर्घृणपणे खून केला आणि त्यांच्या घरातील सर्व मौल्यवान सोन्याचे दागिने आणि इतर चांदीच्या वस्तू या सगळ्या चोरून नेल्या, हा आरोप हा सिद्ध झाल्यामुळे कोर्टाने त्यांना 302 या कलमाखाली त्याचप्रमाणे कलम 394 दरोडा टाकून खून केल्याचा संघंमताने कट केला आणि तिघांच्या प्रेतांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशा वेगवेगळ्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरलेले आहे. उद्या शिक्षा न्यायालय उद्या त्याबद्दलची शिक्षा जाहीर करणार आहे. हा खटला संपूर्ण परिस्थितीजन्य पुरव्यासहित आढळतात यात प्रत्यक्षदर्शी कुणी साक्षीदार नव्हता. परंतु यातील तपास अधिकारी आनंद भोईटे आणि पोलीस कॉन्स्टेबल भुजारे यांनी अतिशय मेहनतीने हा तपास केल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

