“शिंदे काय आहेत, ते त्यांनी 1 वर्षापूर्वीच दाखवून दिलं”, शिवसेनेच्या नेत्याचा आदित्य ठाकरे यांना टोला
मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील वांद्रे येथील ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई केली. ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत ही कारवाई केल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं. यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फलटण : मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील वांद्रे येथील ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई केली. ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत ही कारवाई केल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं. यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राजकीय हेतूने आणि चिंधी मनाने या कारवाया होत, असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे कोण आहेत, हे एका वर्षापुर्वी शिंदेंनी दाखवलं आहे.शिंदे यांची ताकद काय ती 50 लोकांनी दाखवून दिली आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी समजून घ्यावं,” असं शंभूराज देसाई म्हणाले.
Published on: Jun 23, 2023 12:16 PM
Latest Videos
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

