पक्ष वेगळे, पण प्रवास एकाच रेल्वे डब्यातून, मोठी घडामोड घडणार?
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच रेल्वे गाडीतून प्रवास केल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच रेल्वे गाडीतून प्रवास केल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही नेते राजधानी एक्सप्रेसने जळगावला रवाना झाले आहेत. या दोन्ही नेत्यांचा फोटो समोर आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ही भेट ठरवून झाली नसल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. शरद पवार हे राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या कार्यक्रम निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर मंत्री गुलाबराव पाटील हे कॅबिनेटची बैठक आटोपून जळगावला रवाना झाले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकाच ट्रेनने प्रवास केल्याचं समोर आलं आहे.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

