‘साहेबांचा नाद केला आता…’, धनंजय मुंडे यांना हरवा; शरद पवार उतरले मैदानात
परळीमध्ये शरद पवारांनी एक सभा घेतली आणि धनंजय मुंडे यांना पराभूत करा, धनंजय मुंडे यांच्या डोक्यात हवा गेली, अशी टीका शरद पवारांनी केली. राष्ट्रवादी फोडणाऱ्या तीन लोकांमध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग होता. असं अप्रत्यक्षपणे म्हणत शरद पवार आक्रमक झालेत.
परळीत सभा घेऊन शरद पवारांनी धनंजय मुंडेंना पराभूत करा, असं आवाहन मतदारांना केलं. राष्ट्रवादी फोडण्यात दोन ते तीन लोकांचा हात आहे. पण नाव सांगण्याची गरज नाही, असं म्हणत शरद पवारांनी धनंजय मुंडेंकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवलं. परळीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना तिकीट दिलं. शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांच्यासाठीच परळीत सभा घेतली आणि धनंजय मुंडे यांचा जोरदार समाचार घेतला. राजकीय संकटात साथ दिली पण धनंजय मुंडेंच्या डोक्यात हवा गेली, अशी टीका शरद पवारांनी केली. तर धनंजय मुंडेंवर राजेसाहेब देशमुखही तुटून पडले. कोणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करू नका, असं धनंजय मुंडेच म्हणायचे पण आता धनंजय मुंडेंनीच शरद पवारांचा नाद केला. म्हणून परळीची जनता हिशोब घेणार असं राजेसाहेब देशमुख म्हणाले. बघा स्पेशल रिपोर्ट
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

