आधी वाद अन् अता पाठराखण, रोहित पवार यांच्या समर्थनात आव्हाड यांचं ट्वीट; आपलेच ‘घरभेदी’ सहकारी…
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने छापा टाकला आहे. शुक्रवारी पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीने छापा टाकला. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी या कारवाई संदर्भात ट्वीट करत रोहित पवार यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. काय केलं समर्थनार्थ ट्वीट
मुंबई, ५ जानेवारी २०२४ : रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने छापा टाकला आहे. शुक्रवारी पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीने छापा टाकला. यामध्ये रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीने धाड टाकली. त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी या कारवाई संदर्भात ट्वीट करत रोहित पवार यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. ते असे म्हणाले, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. शरद पवार यांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याची हे त्याचं फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच “घरभेदी” सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित पवार या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

