Jayant Patil Video : जयंत पाटलांच्या मनात नेमकं आहे तरी काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय, ‘मला बाहेर…’
जयंत पाटील यांनी शरद पवार यांना सूचक इशारा दिल्याचं वक्तव्य भाजपचे नेते आणि जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. तर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
‘नाराज वैगेरे काही नाही, मला बाहेर बोलायची चोरी झालीय’, असं जयंत पाटील म्हणाले. शक्तीपीठसंदर्भातील मोर्चाला संबोधित करताना मी बोलत होतो. जयंत पाटील यांनी केलेल्या सूचक विधानावर त्यांनी आता पुन्हा स्पष्टीकरण दिल्याचे पाहायला मिळत आहे. ‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. तुम्हाला माझ्याबद्दल तुमच्या मनात शंका असल्याने तुम्हाला हमी देणं हे देखील धोक्याचं आहे’, असं म्हणत जयंत पाटील यांनी राजू शेट्टींना मिशकील टोला लगावला होता. लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते. ते माझा सल्ला ऐकत नाही. आपली एकी कायम ठेवा. संघर्ष करण्यासाठी ठाम रहा, असे जयंत पाटील यांनी म्हटले होतं. शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना हे विधान केलं होतं. यानंतर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना सतर्क राहण्याची गरज असल्याचेही भाष्य केलं आहे. त्यामुळे जयंत पाटलांच्या मनात नेमकं चालंलय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Published on: Mar 14, 2025 03:14 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
