‘शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज’, जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
‘राजू शेट्टीनी माझं ऐकलं असतं तर ते आज खासदार असते’, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीकडून लोकसभा लढा, राजू शेट्टीना अनेकदा सांगितलं होतं पण राजू शेट्टी माझं एकतंच नाही, असं वक्तव्य करत जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना मिश्कील टोला लगावला होता. यावर विखे पाटलांनी भाष्य केले आहे.
जयंत पाटील यांनी शरद पवार यांना सूचक इशारा दिल्याचं वक्तव्य भाजपचे नेते आणि जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. तर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असंही म्हणत जयंत पाटील यांनी राजू शेट्टींना मिशकील टोला यावेळी लगावला होता. यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांना सवाल केला असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘जयंत पाटील यांनी शरद पवार यांना सूचक इशारा दिल्याचे दिसंतय. त्यामुळे शरद पवारांनी सतर्क राहायला हवे’, असं माध्यमांसमोर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. माझी गॅरंटी घेऊ नका, असं म्हणत असताना जयंत पाटील यांनी असेही म्हटले होते, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते. ते माझा सल्ला ऐकत नाही. आपली एकी कायम ठेवा. संघर्ष करण्यासाठी ठाम रहा, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
