Jayant Patil Video : ‘माझं काही खरं नाही, माझी गॅरंटी घेऊ नका, कारण…’; जयंत पाटलांचा कोणाला मिश्कील टोला?
शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना खळबळजनक विधान केले.
‘राजू शेट्टीनी माझं ऐकलं असतं तर ते आज खासदार असते’, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीकडून लोकसभा लढा, राजू शेट्टीना अनेकदा सांगितलं होतं पण राजू शेट्टी माझं एकतंच नाही, असं वक्तव्य करत जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना मिश्कील टोला लगावला. तर माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असंही म्हणत जयंत पाटील यांनी राजू शेट्टींना मिशकील टोला यावेळी लगावला. लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते. ते माझा सल्ला ऐकत नाही. आपली एकी कायम ठेवा. संघर्ष करण्यासाठी ठाम रहा, असे जयंत पाटील यांनी म्हटले. जयंत पाटील पुढे असेही म्हणाले, सांगायचा मुद्दा असा की ते आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आलं असतं आणि ते खासदार झाले असते. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत हा माझा प्रॉब्लेम आहे. बंटी पाटील यासा साक्षीदार आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, ‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,’ जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
