शरद पवार सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यानच आणखी वेगळंच घडलं! पक्षातील नेत्यांकडून भाजप मंत्र्याचं तोंडभर कैतुक
राज्याच्या राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. मात्र, विधानसभेत आज वेगळे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामकाजाचे कौतुक केले.
राज्याच्या राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. मात्र, विधानसभेत आज वेगळे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामकाजाचे कौतुक केले. अलीकडेच शरद पवार गट सत्तधारी पक्षांना पाठिंबा देणार अशा चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता राष्ट्रावादीतील नेत्यांच्या विधानाने नजरा वळवल्या आहेत.
विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी महसूल विभागातील काही निर्णयांचे स्वागत केले. भूमाफियांना शिस्त लावण्याचे काम सरकार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महसूल विभागाच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी विरोधी पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील सभागृहात उपस्थित होते. त्यांनीही बावनकुळेंची कामं कौतुकास्पद असल्याचे सांगितले, सत्ताधारी आणि विरोधकांमधील तीव्र राजकीय संघर्षाच्या वातावरणात जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Jul 08, 2026 01:29 PM
शरद पवार सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यानच आणखी वेगळंच घडलं! पक्षातील
राजकीय हालाचालींना वेग! संजय राऊतांचं नितेश राणेंना पत्र, थेट म्हणाले
महाराष्ट्राच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावलं; पूरस्थितीवर शाह-फडणवीस
रस्त्यावर चालत होता, अचानक बेस्ट बसने मागून धडक दिली अन् पुढे जे घडलं

