Shefali Jariwala : सिद्धार्थ शुक्लाला घट्ट मिठी अन्… 42 व्या वर्षी निधन झालेल्या शेफालीच्या अखेरच्या पोस्टची का होतेय चर्चा?
शेफाली जरीवालाच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या अभिनेत्री शेफालीची शेवटची पोस्टही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शेफाली टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला मिठी मारताना दिसतेय.
बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी निधन झाले. शेफाली हृदयाशी संबंधित आजारांसह इतर काही आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती मिळतेय. शुक्रवारी रात्री शेफालीला अचानक छातीत दुखू लागले. यानंतर तिला तिच्या पतीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केले. सध्या शेफालीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या शेफालीच्या मृत्यूचे कारण शोधले जात आहे.
अशातच शेफालीची एक्सवरील एक शेवटची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये शेफालीने तिचा बिग बॉस-१३ चा मित्र सिद्धार्थ शुक्लाला मिठी मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत शेफालीने भावनिक कॅप्शन देत सिद्धार्थ शुक्लाला ती मिस करत असल्याचे दिसून येतंय. धक्कादायक म्हणजे सिद्धार्थ शुक्लाचेही वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे या पोस्टची चांगलीच चर्चा होतेय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

