कुणबी दाखल्यांना विरोध करणारे एकमेव छगन भुजबळ आरपारच्या तयारीत
कुणबी दाखल्यांवरून मंत्री छगन भुजबळ आरपारच्या तयारीत. शिंदे गटातील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही भुजबळ ठाम. ओबीसी आरक्षणावरून यापूर्वी देखील भुजबळांनी आपला आक्रमकपणा शिवेसनेतून बाहेर पडून दाखवला. तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात असल्याने मंत्रिमंडळातील एकमेव विरोधक असणारे भुजबळच.
मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३ | कुणबी दाखल्यांवरून मंत्री छगन भुजबळ आरपारच्या तयारीत असल्याचे दिसतंय. शिंदे गटातील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भुजबळ ठाम आहेत. ओबीसी आरक्षणावरून यापूर्वी देखील भुजबळांनी आपला आक्रमकपणा शिवेसनेतून बाहेर पडून दाखवला आहे. ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांची ओळख त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला तर कोणाचंही न ऐकणारे फायर ब्रँड नेते. सध्या मराठ्यांना कुणबी नोंदींवरून कुणबी जात प्रमाणपत्रातं जात प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. त्यावरून मंत्रिमंडळातील एकमेव विरोधक असणारे मंत्री छगन भुजबळच आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेने भुजबळ यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्यावर सुद्धा पुन्हा ठाम असल्याचे दाखवून दिले. मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेची तोफ असलेल्या छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सोडलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट