शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईक यांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; जाहीरपणे म्हणाले…
हिवाळी आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायरीवर विरोधकांनी शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले.
नागपूर, ७ डिसेंबर २०२३ : आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. मात्र या आधिवेशनाच्या सुरूवातीलाच विधीमंडळाच्या पायरीवर विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिंदे गटाच्या आमदाराने ठाकरे गटाच्या आमदाराला पक्षप्रवेशाची थेट ऑफरच दिली. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी गोगावले यांना तुम्ही कोट घाला. मंत्री व्हा, असा खोचक टोला लगावला. तर वैभव, तू आमच्याकडे ये, अशी खुली ऑफरच भरत गोगावले यांनी वैभव नाईक यांना दिली. तर ही ऑफर कोण देतंय? त्यांना मिळालं नाही, ते देत आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही उठाव केला. तुम्ही दोघं पुढे होता. त्या मानाने तुम्हाला मिळालं नाही. त्याचं दुखं आहे, असे भाष्य वैभव नाईक यांनी केले.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली

