दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियन प्रकरणात मला वाटते आदित्य ठाकरे यांचा हात आहे, असे म्हणत संजय शिरसाट यांचा थेट हल्लाबोल
नागपूर, ७ डिसेंबर २०२३ : दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियन प्रकरणात मला वाटते आदित्य ठाकरे यांचा हात आहे, असे म्हणत संजय शिरसाट यांनी थेट हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचे प्राथमिकपणे दिसत असल्याचे संजय शिरसाट म्हणाले. तर आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एसआयटी चौकशी नेमण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे सरकारसह गृहखात्याच्या हाती काही पुरावे आले आहेत. ज्यावेळी एखाद्या प्रकरणात पुरावे आढळतात तेव्हा त्यावर सखोल चौकशी करणं अपेक्षित असते, असे संजय शिरसाट म्हणाले. तर आदित्य ठाकरे असतील किंवा त्यांचे सहकारी असतील जे जे दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई कऱण्यात येईल, असे म्हणत शिरसाट यांनी इशारा दिलाय.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा

