‘उथळ प्रसिद्धीचा सोपा धंदा, आधी अभ्यास करावा नेटका’; शिंदे गटाचे मनसेच्या ‘त्या’ बॅनरला जोरदार प्रत्युत्तर
सध्या डोंबिवलीमध्ये मनसे आणि शिंदे गटात बॅनर वॉर सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. शिंदे गटाकडून देखील मनसेच्या बॅनरला आता जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मुंबई : सध्या डोंबिवलीमध्ये मनसे (MNS) आणि शिंदे गटात बॅनर वॉर (Banner war) सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. वर्क ऑडर निघून दोन महिने उलटले तरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला होता. यावरून मनसेने ‘मुहूर्त शोधण्यासाठी ज्योतिषी नेमणे आहे’, अशा अशायाचे बॅनर डोंबिवलीमध्ये लावले होते. तसेच रस्त्याचे काम कधी निवडणुकीच्या तोंडावर करणार का? असा सवालही मनसेच्यावतीने करण्यात आला होता. आता मनसेच्या या टीकेला शिंदे गटाकडून देखील बॅनरच्याच माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘उथळ प्रसिद्धीचा सोपा धंदा, आधी अभ्यास करावा नेटक! मग यावे टिकेकरिता’ असा मजकूर लिहिलेले बॅनर चौकाचौकात उभारण्यात आले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

