Chandrashekhar Bawankule | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील, बावनकुळे यांचे वक्तव्य
Chandrashekhar Bawankule | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले आहे.
Chandrashekhar Bawankule | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या भेटीला सध्या भाजपच्या पुढाऱ्यांची रीघ लागली आहे. भाजपच्या फळीतील मोठे नेते हे राज ठाकरे यांच्या निवसस्थानी भेट देण्यासाठी पोहचत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे हा आगामी निवडणुकीत भाजपचा साथीदार असेल का असा प्रश्न बावनकुळे यांना विचारण्यात आला. त्यावर हा निर्णय निवडणुकींच्या तोंडावर घेण्यात येईल असे म्हणत त्यांनी विषय टोलावला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील असे त्यांनी स्पष्ट केले. अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येत आहे. त्यावेळी ते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याविषयावर काही बोलणे बावनकुळे यांनी टाळले. मात्र आगामी निवडणुकीत ठाकरे यांना बिन्नीचा शिलेदार करण्यात येईल असे तरी संकेत मिळत आहेत.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

