महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
पिठासीन अधिकारी म्हणून माझ्यावर संवैधानिक जबाबदारी, कायद्याच्या सर्व तरतुदींच पालन करून निर्णय घेतला तो कोर्टातही टिकेल. आमदार अपात्रतेवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नरवेकरांची प्रतिक्रिया. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा, चंद्रचूड यांच्या निर्णयावरती बोट ठेवत सिब्बलांकडून प्रकरण सात न्यायमूर्तींच्या बेंचकडे सोपवण्याची मागणी. एकाचवेळी विधानसभा अध्यक्ष आणि आयोगाला सुनावणीचे अधिकार देणं चूक असल्याचा युक्तिवाद. […]
पिठासीन अधिकारी म्हणून माझ्यावर संवैधानिक जबाबदारी, कायद्याच्या सर्व तरतुदींच पालन करून निर्णय घेतला तो कोर्टातही टिकेल. आमदार अपात्रतेवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नरवेकरांची प्रतिक्रिया. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा, चंद्रचूड यांच्या निर्णयावरती बोट ठेवत सिब्बलांकडून प्रकरण सात न्यायमूर्तींच्या बेंचकडे सोपवण्याची मागणी. एकाचवेळी विधानसभा अध्यक्ष आणि आयोगाला सुनावणीचे अधिकार देणं चूक असल्याचा युक्तिवाद. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. पक्षांतर बंदी कायद्यानुसार 39 आमदारांना अपात्र केलं असतं तर निर्णय ठाकरेंच्या बाजूने असता, सिब्बल यांचा युक्तिवाद. सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट. भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली आणि पक्षचिन्हही दिलं. संजय रावतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. वाचवण्याच्या प्रयत्नात सुरक्षारक्षक गंभीर जखमी. हल्लेखोर अटकेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकृतीची विचारपूस करत चौकशीचे आदेश. चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरावरून शरद पवारांची फेसबुक पोस्ट. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही. पवारांकडून चिंता व्यक्त. उद्योजकांसाठी एक खिडकी यंत्रणा उभारण्याचं आवाहन. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी एक महिन्याची अतिरिक्त मुदत. नियमांच पालन न केल्यास कारवाई केली जाणार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपची तिरंगा रॅली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीचं आयोजन. ओबीसी आंदोलकांची आज पुण्यामध्ये बैठक. विविध प्रलंबित मागण्या हक्कांसाठी बैठकीचं आयोजन. पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहांना राजीनामा होईपर्यंत झोपू देणार नाही. राहुल गांधींचा इशारा. तर भारत द्वेष पसरवणारा नव्हे तर प्रेम वाढवणारा देश असल्याचही वक्तव्य. विरोधकांमध्ये चर्चा करण्याची हिम्मत नाहीये. संसदेतून तोंड लपवून पळालेले पळपुटे आहेत. विरोधकांना झारखंड बाबत उत्तर द्यावं लागेल. मुख्यमंत्री फडणवीसांचा इंडिया आघाडीवर निशाणा. नाशिक कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणी जामनेरमधून आणखी तिघे ताब्यात. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाची मोहीम. कुंभमेळ्याची काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत 3 कोटी 45 लाखांची फसवणूक. चेंबूरमधील नामांकित पार्ले फ्रुटी कंपनीच्या गोदामावर एफडीएचा छापा. गोदामात मुदत संपलेल्या फ्रुटीचा साठा असल्याची माहिती. तर वाशीनाकाच्या गडकरी खदानजवळील प्रयाग नगर परिसरात कारवाई. नाशिकमध्ये आज पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के. 3.4 रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. राज्यात आजपासून पुढील पाच दिवस मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. मुंबईसह कोकण, खानदेश, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा. मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाचा अंदाज. वडोदरा-मुंबई महामार्गाच्या कामांसाठी आज वीजबंदी. कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरसह अनेक भागांतील वीजपुरवठा बंद राहणार. आज 11:00 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार. महाराष्ट्रातील आश्रम शाळांमध्ये दोन वर्षांत 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू. 11% घटना आश्रम शाळांच्या आवारात. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 5% मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याची माहिती समोर. राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यास 10 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचणं बंधनकारक. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नवी नियमावली. 10 मिनिटांत रुग्णवाहिका न पोहोचल्यास 10 हजारांचा दंड ठोठावला जाणार.
Published on: Aug 14, 2026 08:32 AM
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...

