AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना विधानसभेच्या किती जागा लढवणार? संजय गायकवाड यांनी स्पष्टच सांगितले...

शिवसेना विधानसभेच्या किती जागा लढवणार? संजय गायकवाड यांनी स्पष्टच सांगितले…

| Updated on: Mar 18, 2023 | 6:28 PM
Share

VIDEO | चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर संजय गायकवाड यांचं मोठं विधान, काय म्हणाले बघा व्हिडीओ

बुलढाणा : येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत भाजप २४० जागा लढवणार आणि शिंदे गटाला कमी जागा देणार असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी केले आहे. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठं विधान केले आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना आणि भाजपची ही युती आहे. त्यामुळे कोणता नेता कुठलं वक्तव्य करत असेल तर त्याला काही महत्त्व नाही. आमची युती देशाचे पंतप्रधना नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा हा युतीचा विषय आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही 130 ते 140 जागा लढवणार आहेत. आमच्या पेक्षा भाजप मोठा पक्ष असल्याने तो जास्त जागा लढवेल मात्र आम्ही 130 त्यापेक्षा कमी जागा लढणार नाही.’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.