Special Report | संजय राऊतांनी छगन भुजबळांना डिवचलं
छगन भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडवा, असा सल्ला रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी देत पुन्हा एकदा कांदेंच्या पाठीवर थाप मारली. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
नाशिकः नांदगाव महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले, ते फक्त सुहास कांदे आमदार असल्यामुळे. त्यामुळे छगन भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडवा, असा सल्ला रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी देत पुन्हा एकदा कांदेंच्या पाठीवर थाप मारली. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राऊत रविवारी नांदगाव मतदार संघात होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार सुहास कांदे यांनी राऊत यांच्यासमोर आपले दुःख मांडले. आमदार कांदे म्हणाले, राऊत साहेब आपणच वाली आहात. आम्ही आमचं दुःखं कोणाकडे मांडायचं (असं म्हणत छगन भुजबळ यांना टोला हाणला). मी भुजबळ यांच्या मुलाला पाडलं म्हणून बोलत नाही. ते मला सावत्र मुलासारखं करतात. आम्ही कोणाकडे जाणार. तुमच्याकडेच मागणार आणि आता निधी दिला नाही तर अख्खी DPDC घेऊन येणार असा इशाराही दिला.
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
